“मिसर, गिलादला जा आणि काही औषध मिळव. तू खूप औषधे मिळवशील, पण त्याचा उपयोग होणार नाही तू बरा होणार नाहीस.
Cross references
योसेफ खाड्यात असताना त्याचे भाऊ भाकरी खावयास बसले. त्यांनी वर नजर करुन पाहिले तेव्हा त्यांना दुरुन एक उंटांचा तांडा दिसला; ते आपल्या, उंटांवर मसाल्याचे अनेक पदार्थ व वनस्पती इत्यादी भारी किंमतीचे पदार्थ लादून गिलादाहून मिसरकडे चालले होते.
मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “हे जर अगदी खरे असेल तर मग तुम्ही बन्यामीनाला तुमच्याबरोबर घेऊन जा; परंतु त्या प्रमुख अधिकाऱ्याकरिता आपल्या देशातून आपण मिळवलेल्या काही किंमती वस्तू, काही पदार्थ म्हणजे थोडा मध, पिस्ते, बादाम, डिंक, गंधरस वगैरे देणग्या भेट म्हणून घेऊन जा.
“धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
“यिर्मया, यहूदाच्या लोकांना माझा संदेश सांग: ‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत. माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन. माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का? कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे. ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे, कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
पण बाबेलचे अकस्मात पतन होईल आणि त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या दु:खावर इलाज करा. कदाचित् तिच्या जखमा भरुन येतील.
“यहूदा व इस्राएल ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या वस्तूंच्या मोबदल्यात गहू. आँलिव्ह, अंजिराचा पहिला बहर, मध, तेल आणि उपशामक औषध देत.
“मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”
शोमरोनची जखम भरुन येऊ शकत नाही. तिचा आजार (पाप) यहूदापर्यंत पसरला आहे. तो माझ्या माणसांच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. तो पार यरुशलेमपर्यंत पसरला आहे.
निनवे, तुला खूप मार लागला आणि तुझी जखम कशानेही भरून येऊ शकत नाही. तुझ्या नाशाची बातमी एकताच प्रत्येकजण टाव्व्या वाजवितो सर्वानाच त्यामुळे आनंद वाटतो. का? कारण तू त्यांना नेहमी ज्या यातना दिल्यास, त्या ते विसरले नाहीत.
मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
आणि एक स्त्री तेथे होती. तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही.