Home Bibles 2 राजे 11:5 · मराठी बायबल
2 राजे 11:5 · मराठी बायबल

यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.

Cross references

1 राजे 10:5

त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांच्या पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्रृर्याने थक्क झाली.

2 राजे 11:19

सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.

2 राजे 16:18

शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.

1 इतिहास 9:25

आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.

1 इतिहास 23:3

तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. तसे एकंदर 38,000 लेवी होते.

1 इतिहास 23:32

त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वरच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.

1 इतिहास 24:3

प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या

यिर्मया 26:10

यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिगत कळली, म्हणून ते राजवाड्यातून बाहेर आले व देवाच्या मंदिरात गेले. तेथे ते नव्या प्रवेशद्वाराजवळ आपापल्या स्थानांवर बसले. ‘नवे प्रवेशद्वार’ परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचे दार होते.

यहेज्केल 44:2

परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे.

यहेज्केल 46:2

राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही.

लूक 1:8

जेव्हा जख जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता,

Interlinear

Choose Theme