Home Bibles यहेज्केल 44:2 · मराठी बायबल
यहेज्केल 44:2 · मराठी बायबल

परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे.

Cross references

निर्गम 24:10

तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता!

यशया 6:1

उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते.

यहेज्केल 43:1

पूर्वेकडे तोंड असलेल्या दाराजवळ त्या माणसाने मला नेले.

यहेज्केल 43:2

पूर्वेकडून तेथे इस्राएलच्या देवाची प्रभा फाकली. समुद्राच्या गर्जनेप्रमाणे देवाचा आवाज प्रचंड होता. त्याच्या प्रभेने भूमी उजळली होती.

यहेज्केल 43:4

परमेश्वराची प्रभा पूर्वेच्या दारातून मंदिरात आली.

यहेज्केल 46:1

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल.

Interlinear

Choose Theme