Home Bibles 2 करिंथकरांस 10:13 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 10:13 · मराठी बायबल

परंतु आम्ही आमच्या आम्हांला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हांस घालून दिली आहे, तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करुन घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोंचणारी आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 19:4

परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.

नीतिसूत्रे 25:14

जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.

यशया 28:17

“भिंतीचा सरळपणा पाहण्यासाठी लोक जसा ओळंबा वापरतात, तसाच योग्य गोष्ट दाखविण्यासाठी मी न्यायबुध्दी व चांगुलपणा ह्यांचा वापर करीन.“तुम्ही पापी, तुमच्या कपटाच्या व असत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हांला शिक्षा होईल. मी वादळाप्रमाणे अथवा पुराप्रमाणे येऊन तुमच्या लपायच्या जागा नष्ट करीन.

मत्तय 25:15

त्याच्यांतील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला.

रोमकरांस 10:18

परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? “होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.”स्तोत्र. 11:4

रोमकरांस 12:3

मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा.

रोमकरांस 12:6

देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे.

रोमकरांस 15:20

जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे. यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधु नये.

1 करिंथकरांस 12:11

परंतु तो एकच आत्मा जो त्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देऊन ही सर्व कार्ये पूर्णत्वास नेतो.

2 करिंथकरांस 10:14

आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्याप्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो.

इफिसकरांस 4:7

ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे.

1 पेत्र 4:10

तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडील कारभारी या नात्याने तुम्हाला प्राप्त झालेल्या विविध दानांचा एकमेकांची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वक वापर. करावा वेगवेगळी दाने असलेला कारभारी करतो तसा करावा.

Interlinear

Choose Theme