इथे येऊन स्वत: अनुभव घेईपर्यंत मला त्या गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस.
Cross references
पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते.
देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे.
मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.
देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस. तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.
सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा? तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का? म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?
सर्व काही चांगले आणि सुंदर होईल. सर्वत्र आश्चर्यकारक पीक येईल. पण हे पीक फक्त अन्नधान्य व मद्य देणारे नसेल तर तरुण - तरुणींचे असेल.
तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,“डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या अंत:करणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”यशया 64:4
प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजूनमाहीत करुन देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखेअसू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.