Home Bibles 2 इतिहास 33:15 · मराठी बायबल
2 इतिहास 33:15 · मराठी बायबल

परक्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुशलेममध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरुशलेम नगराबाहेर टाकून दिल्या.

Cross references

2 राजे 21:7

मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करुन तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दावीदचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व नगरांमधून मी यरुशलेमची निवड केली आहे. यरुशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.

2 इतिहास 33:3

हिज्कीयाने जी उंचस्थाने उद्ध्वस्त केली होती तीच मनश्शेने पुन्हा बांधली. त्याने बआल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले. नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणांची पूजाही करत असे.

2 इतिहास 34:3

आपल्या कारकीर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकीर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरुशलेममधील उंच स्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली.

यशया 2:17

त्या वेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील.

यहेज्केल 18:20

पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.

होशेय 14:1

इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये.

मत्तय 3:8

म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या.

मत्तय 25:16

ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे.

Interlinear

Choose Theme