यहीएल, अजऱ्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या माणसांची निवड केली.
Cross references
अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकाही होता.
दोन्ही घराण्यातील पुरुषांनी निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.
पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रितीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.
आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले.
तेव्हा सादोकच्या घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हाला पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या प्रजेला खरोखरच दुवा दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”
या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांना, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी 2,600 शेरडे मेंढरे आणि 300 बैल एवढे पशू वल्हांडणाचे बळी म्हणून याजकांना दिले.
हिल्कीयाचा मुलगा सराया (हिल्कीया मशुल्लामचा मुलगा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोमचा, मरायोम अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता.)