Home Bibles 2 इतिहास 29:34 · मराठी बायबल
2 इतिहास 29:34 · मराठी बायबल

होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. या पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.

Cross references

गणना 8:15

“तेव्हा तू लेवी लोकांना शुद्ध कर आणि ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे परमेश्वराला त्यांना समर्पित कर. तू हे केल्यानंतर त्यांनी दर्शनमंडपात येऊन आपले काम करावे.

गणना 8:19

इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”

गणना 18:3

लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.

गणना 18:6

इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी लोकांना निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांना मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शन मंडपात काम करतील.

2 राजे 12:6

तरीही याजकांनी काहीही सुरु केले नाही. योवाशचे राजा म्हणून तेविसावे वर्ष चालू होते तोपर्यत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केलेली नव्हती.

1 इतिहास 29:17

हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.

2 इतिहास 30:3

सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरुशलेममध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते.

2 इतिहास 30:15

दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बळी दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत:ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.

2 इतिहास 30:16

देवाचा माणूस मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवींच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले.

2 इतिहास 35:11

वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. लेवींनी त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. याजकांनी हे रक्त वेदीवर शिंपडले.

स्तोत्रसंहिता 7:10

ज्याचे ह्दय सच्चे आहे अशांना देव मदत करतो म्हणून तो माझे रक्षण करेल.

स्तोत्रसंहिता 26:6

परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.

स्तोत्रसंहिता 94:15

न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.

Interlinear

Choose Theme