2 इतिहास 27:6 · मराठी बायबल
परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.
Cross references
2 इतिहास 17:3
यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. ते बाल देवतेच्या भजनी लागला नाही.
2 इतिहास 17:4
आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
2 इतिहास 19:3
पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वराला अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.”
2 इतिहास 26:5
जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.