Home Bibles 2 इतिहास 25:7 · मराठी बायबल
2 इतिहास 25:7 · मराठी बायबल

पण यावेळी देवाचा एक माणूस अमस्याकडे येऊन त्याला म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांना परमेश्वराची साथ नाही.

Cross references

2 शमुवेल 12:1

परमेश्वराने नाथानला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, “एका नगरात दोन माणसे होती. एक श्रीमंत होता आणि एक गरीब.

1 राजे 12:28

त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”

1 राजे 13:1

परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या माणसाला) यहूदाहून बथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.

2 इतिहास 13:12

खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देंवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यात तुम्हाला यश येणार नाही.”

2 इतिहास 19:2

हनानीचा मुलगा येहू हा द्रष्टा होता. तो यहोशाफाटला सामोरा गेला. येहू यहोशाफाटला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.

यशया 28:1

शोमरोनकडे पाहा. एफ्राइममधील मद्यप्यांना त्या शहराचा फार गर्व आहे. आजूबाजूला सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. शोमरोनमधील रहिवाशांना आपले शहर फुलांच्या सुंदर मुकुटाप्रमाणे वाटते. पण ते मद्यपान करून धुंद झाले आहेत आणि हा “सुंदर मुकुट” सुकून चालला आहे.

होशेय 5:13

एफ्राईमने स्वत:चा आजार व यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.

होशेय 9:13

एफ्राईम आपल्या मुलांना सापळ्याकडे नेत आहे, हे मी पाहू शकतो एफ्राईम आपली मुले मारेकऱ्यापुढे आणतो. परमेश्वर, त्यांना तुझ्या इच्छेप्रमाणे दे. गर्भापात होणारी गर्भाशये दे दूध न देणारे स्तन दे.

1 तीमथ्याला 6:11

पण देवाच्या माणासा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता, आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर.

2 तीमथ्थाला 3:17

यासाठी की, देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.

Interlinear

Choose Theme