Home Bibles 2 इतिहास 25:22 · मराठी बायबल
2 इतिहास 25:22 · मराठी बायबल

इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.

Cross references

1 शमुवेल 4:10

तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले.

1 राजे 22:36

सूर्यास्ताच्या वेळी इस्राएलच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.

2 राजे 13:12

‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात, योवाशने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकीकत आलेली आहे.

2 इतिहास 28:5

आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामच्या राजाच्या हातून आहाजचा पराभव करविला. अरामच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजचा पाडाव करुन यहूदाच्या लोकांना कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजचा पराभव करवला. पेकहच्या वडलांचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे 1,20,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला.

Interlinear

Choose Theme