आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामच्या राजाच्या हातून आहाजचा पराभव करविला. अरामच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजचा पाडाव करुन यहूदाच्या लोकांना कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजचा पराभव करवला. पेकहच्या वडलांचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे 1,20,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला.
Cross references
“मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना.
अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुशलेमवर स्वारी करुन आले. रसीन आणि पेकह यांनी आहाजला घेरले. पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत.
अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशला हे शासन केले.
म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपली बायका पोरे कैदी झाली.
तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.
यहोयाकीम पंचविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. यहोयाकीमने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या. त्याने परमेश्वर देवा विरुध्द पाप केले.
तेव्हा बाबेलच्या राजाला देवाने यहूदा व यरुशलेमवर स्वारी कारयला लावले. बाबेलच्या राजाने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांना जिवे मारताना तरुण-वृध्द, स्त्री-पुरुष, रोगी-निरोगी असा भेदाभेद बाळगला नाही. देवानेच नबुखद्नेस्सरला यहूदा व यरुशलेमच्या लोकांना शासन करायची मुभा दीली होती.
यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन व पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.
आपण चाल करून जाऊ आणि यहुदाविरूध्द लढून यहुदा जिंकू. आपण आपापसात यहुदाची वाटणी करू आणि ताबेलाच्या पुत्राला यहुदाच्या गादीवर बसवू. असा त्यांचा बेत आहे.”‘
तुला शिक्षा होण्याआधी, तुझे शेजारी तुझी थट्टा करण्याआधी, तू अशी वागलीस. अरामच्या आणि पलिष्ट्यांच्या मुली आता तुझी चेष्टा करीत आहेत.