2 इतिहास 17:8 · मराठी बायबल
त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवींचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
Cross references
2 इतिहास 19:8
यानंतर यहोशाफाटाने यरुशलेममध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वडीलधारी मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेममधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता.
एज्रा 7:1
या घडामोडी नंतर,पारसचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा हा सरायाचा मुलगा, सराया अजऱ्याचा, अजऱ्या हिल्कीयाचा मुलगा.
मलाखी 2:7
परमेश्वराची शिकवण याजकांना माहीत असली पाहिजे. लोकांना याजकांकडून देवाची शिकवण घेता यावी. याजक लोकांसाठी देवाचा दूत असावा.”