Home Bibles एज्रा 7:1 · मराठी बायबल
एज्रा 7:1 · मराठी बायबल

या घडामोडी नंतर,पारसचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा हा सरायाचा मुलगा, सराया अजऱ्याचा, अजऱ्या हिल्कीयाचा मुलगा.

Cross references

2 राजे 22:4

“तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.

2 राजे 22:8

महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.

2 राजे 25:18

नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल

1 इतिहास 6:4

एलाजाराचा मुलगा फिनहास, फिनहासचा अबीशूवा.

1 इतिहास 9:11

अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकाही होता.

2 इतिहास 34:9

ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलमधून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरुशलेममधून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्द केली.

2 इतिहास 34:15

तेव्हा हिल्कीयाने शाफान या चिटणीसाला असा ग्रंथ सापडल्याचे सांगुन शाफनला तो दिला.

एज्रा 4:7

पुढे अर्तहशश्त पारसाचा राजा झाल्यावर पुन्हा या विरोधकांपैकी काहींनी यहूद्यांविरुध्द कागाळ्यांचे आणखी एक पत्र त्याला लिहिले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे साथी यांनी हे पत्र लिहिले. हे पत्र अरामी भाषेत व अरामी लिपीत लिहिले होते.

एज्रा 6:14

यहुदी वडीलधाऱ्या मंडळींचे मंदिराचे काम चालूच राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यात त्यांना यश आले. इस्राएलच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पुरे केले.

एज्रा 7:10

एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व वेळ मन:पूर्वक अध्ययन आणि पालन केले. त्याला (परमेश्वराचे) हे आदेश आणि नियम इस्राएल लोकांनी शिकवायचे होते, तसेच त्यांच्याकडून तसे आचरण करुन घ्यायचे होते.

एज्रा 7:12

राजा अर्तहशश्त कडून,याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास,अभिवादन!

एज्रा 7:21

आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की फरात नदीच्या पश्रिृमेकडील भागातले जे खजिनदार आहेत त्यांनी एज्राला हवे ते पुरवावे. कारण एज्रा हा स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक आणि याजक आहे. याची अंमलबजावणी पूर्णत्वाने आणि ताबडतोब करावी.

एज्रा 8:1

बाबेलहून यरुशलेमला माझ्याबरोबर, (म्हणजे एज्रारोबर) आपापल्या घराण्यातली जी वडीलधारी मंडळी आणि इतर लोक आले त्यांची नावे आता देतो. अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत आम्ही यरुशलेमला आलो. त्या सर्वाची नावे पुढीलप्रमाणे:

नहेम्या 2:1

राजा अर्तहशश्तच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजासमोर द्राक्षारस आणला गेला. मी तो उचलला आणि राजाला दिला. या पूर्वी मी कधी राजाच्या सहवासात असताना उदास नव्हतो पण यावेळी मात्र कष्टी होतो.

नहेम्या 8:1

त्या वर्षीच्या सातव्या महिन्यात सर्व इस्राएल लोक एकत्र आले. त्यांच्यामध्ये इतकी एकजूट होती की ते एकमेकांशी अगदी तद्रूप झाले होते. पाणी वेशीच्या समोरच्या मोकळया जागेत ते जमले. त्या सर्वांनी शिक्षक एज्राला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले. परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले ते नियमशास्त्र हेच.

नहेम्या 8:2

तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षीच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता.या सभेला स्त्रिया-पुरुष आणि ज्यांना ज्यांना वाचलेले समजत होते असे सर्वजण होते.

नहेम्या 11:11

हिल्कीयाचा मुलगा सराया (हिल्कीया मशुल्लामचा मुलगा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोमचा, मरायोम अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता.)

यिर्मया 52:24

राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सराया व सफन्या यांना कैद करुन नेले. सराया महायाजक होता, तर सफन्या दुय्यम महायाजक होता. तीन द्वारपालांनाही कैदी म्हणून नेले

Interlinear

Choose Theme