आता, हे परमेश्वर देवा, त्यांना तू दिलेले वचन पूर्ण कर. एका फार मोठ्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस. त्यातील प्रजेची संख्या धरतीवरील रज:कणांसारखी विपुल आहे.
Cross references
मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणाइतकी करीन, ती इतकी करीन की जर कोणाला ते कण मोजता येतील तर तुझ्या संततीचीही गणना होईल.
मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतनी आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल.
याकोबची माणसे कोण मोजू शकेल? ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत. त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही. मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे. त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.
“तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन.
“आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे.
माझ्या वडीलांनंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही.
तुझ्या मृत्यूनंतर तू आपल्या पूर्वजांच्या रांगेत जाऊन बसलास की तुझ्या मुलालाच मी राजा करीन. तुझाच मुलगा राजा होईल. त्याचे राज्य मी बळकट करीन.
“परमेश्वरा, मला आणि माझ्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस. ते सर्वकाल अबाधित राहो. तुझ्या म्हणण्याप्रमाणे होवो.
देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे.
परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, माझे मंदिर आणि त्या भोवतालचे आवार याची उभारणी तुझा पुत्र शलमोन याच्या हातून होईल. कारण पुढे राजासनावर तो बसणार आहे. त्यासाठी मी त्याची पुत्र म्हणून निवड केली आहे आणि मी त्याचा पिता आहे.
माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे.