1 इतिहास
Chapter 25
मराठी बायबल1दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:
2आसाफाच्या कुटुंबातून जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला. दावीदाने आसाफला संदेश कथनासाठी निवडले आणि आसाफने आपल्या या मुलांना.
3यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.
4सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
5हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या.
6परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते.
7लेवी घराण्यातील हे लोक आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत निपुण होते. परमेश्वराची स्तुती गीते गाणारी अशी 288 माणसे होती.
8प्रत्येकाने कोणते काम करायचे हे ठरवायला चिठ्ठया टाकल्या जात. त्यांना एकसारखीच वागणूक मिळे. लहान थोर, गुरु-शिष्य असा त्यांच्यात भेदभाव नव्हता.
9पहिली चिठ्ठी आसाफ (योसेफ) याची निघाली. त्यांची मुले आणि नातलग यांच्यातून बारा जणांची निवड झाली.दुसरी गादल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
10जक्कूरचे मुलगे आणि भाऊबंद यांच्यामधून, तिसऱ्या चिठ्ठीनुसार बाराजण घेतले.
11चवथी चिठ्ठी इस्त्रीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बारा.
12पाचवी नथन्याची. त्याच्या मुलां-नातलगामधून बारा.
13सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
14सातवी यशरेलाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
15यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
16नववी मत्तन्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
17दहावी शिमोची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
18अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलाग यांमधून बारा.
19बारवी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बारा.
20तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
21चोदावी मतिथ्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
22पंधरावी यरेमोथची. त्याचे मुलगे आणि नातेवाईक यांमधून बारा.
23सोळावी हनन्याची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
24सतरावी याश्बाकाशाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
25अठरावी हनानीची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
26एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
27विसावी अलीयाथची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
28एकविसावी होथीरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
29बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
30तेविसावी महजियाथची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
31चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
Bible Study with Steffi App
Download Free ↗
Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.