Home Bibles 1 तीमथ्याला 2:9 · मराठी बायबल
1 तीमथ्याला 2:9 · मराठी बायबल

त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वत:ला साध्यासुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने, शोभित करावे. त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करु नयेत. तसेच सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे वापरु नयेत.

Cross references

उत्पत्ति 24:53

त्याने नवरीसाठी आणलेल्या मोलवान भेटवस्तू म्हणजे हिरेमाणके यांनी मढवलेले सोन्याचांदीचे दागदागिने व बरीच सुंदर वस्त्रे रिबकेला दिली; त्याचप्रमाणे त्याने तिचा भाऊ व तिची आई यांना ही मोलवान देणग्या दिल्या.

निर्गम 35:22

ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.

2 राजे 9:30

येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.

एस्तेर 5:1

तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. ती उभी होती तो राजमंदिरासमोरचा भाग होता. राजमंदिरात राजा सिंहासनावर बसला होता आणि त्याचे तोंड लोक येत त्या दिशेलाच होते.

स्तोत्रसंहिता 45:13

राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.

स्तोत्रसंहिता 149:4

परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.

नीतिसूत्रे 7:10

ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले.

नीतिसूत्रे 31:22

ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते.

यशया 3:16

परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”

यशया 3:18

त्या वेळी परमेश्वर ह्या स्त्रियांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा सर्व गोष्टी म्हणजे पैजण, चंद्रसूर्याप्रमाणे असलेले हार, कर्णभूषणे, तोडे, बुरखे, गळपट्टे, पायातल्या साखळ्या, कमरपट्टे, अत्तरांच्या बाटल्या, ताईत, विशेष प्रकारच्या अंगठ्या, नथी, उंची रेशमी वस्त्रे, शेले व शाली, बटवे, आरसे, सुती वस्त्रे फेटे, लांब शाली काढून घेईल.

यशया 61:4

“त्या वेळेला नाश केली गेलेली जुनी शहरे पुन्हा वसविली जातील. ती आरंभी होती तशी नव्याने केली जातील. फार फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी केली जातील.

यिर्मया 2:32

तरुण स्त्री आपले दागिने विसरत नाही. वधू आपला कमरपट्ठा विसरत नाही. पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.

यिर्मया 4:30

यहूदा, तुझा नाश होत आला आहे. मग आता तू काय करीत आहेस? तुझा उत्तम लाल पोशाख तू का घालीत आहेस? तुझे सोन्याचे दागिने तू का घालीत आहेस? तू डोळ्यांचा साजशृंगार का करीत आहेस? तू स्वत:ला सुंदर बनवितेस पण हे वेळेचा अपव्यय करणे आहे. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात. ते तुला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यहेज्केल 16:9

“मी तुला आंघोळ घातली. तुझ्या अंगावरचे रक्त धुवून काढले. तुझ्या अंगाला तेल चोळले.

मत्तय 6:28

“आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत,

मत्तय 11:8

तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलम वस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात.

तीताला 2:3

त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रिना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव. त्यां चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवयनसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे.

1 पेत्र 3:3

तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.

Interlinear

Choose Theme