Home Bibles यिर्मया 2:32 · मराठी बायबल
यिर्मया 2:32 · मराठी बायबल

तरुण स्त्री आपले दागिने विसरत नाही. वधू आपला कमरपट्ठा विसरत नाही. पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.

Cross references

उत्पत्ति 24:22

उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या सेवकाने रिबकेला पांच औंस भाराची (म्हणजे अर्धा शेकेल भाराची) सोन्याची आंगठी दिली; तसेच त्याने प्रत्येकी पाच शेकेल भाराच्या दोन (म्हणजे दहा शेकेल भाराच्या दोन) सोन्याच्या बांगड्या तिला दिल्या.

उत्पत्ति 24:53

त्याने नवरीसाठी आणलेल्या मोलवान भेटवस्तू म्हणजे हिरेमाणके यांनी मढवलेले सोन्याचांदीचे दागदागिने व बरीच सुंदर वस्त्रे रिबकेला दिली; त्याचप्रमाणे त्याने तिचा भाऊ व तिची आई यांना ही मोलवान देणग्या दिल्या.

अनुवाद 32:15

“पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला. खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला! आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.

शास्ते 8:34

भोवतालच्या सर्व शत्रूपासून परमेश्वराने त्यांना वाचवले असले तरी देखील इस्राएल लोकांना आपल्या परमेश्वराचा विसर पडला.

2 शमुवेल 1:24

इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.

स्तोत्रसंहिता 9:17

जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.

स्तोत्रसंहिता 45:13

राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.

स्तोत्रसंहिता 106:21

देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले.

यशया 17:10

असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत.

यशया 61:10

“परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो. देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे. परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो. हे कपडे स्वत:च्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत. परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो. वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.

यिर्मया 2:11

कोणत्या राष्ट्राने, नवीन दैवतांची पूजा करायची म्हणून, जुन्या, दैवतांना पूजायचे थांबविले आहे का? नाही. आणि त्यांचे दैवत मुळी देवच नाही. पण माझ्या लोकांनी त्यांच्या तेजस्वी देवाची पूजा करायचे सोडून कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा करणे सुरु केले.

यिर्मया 3:21

उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. इस्राएले लोक रडत आहेत. ते दयेसाठी याचना करीत आहेत. ते फार पापी झाले. ते त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.

यिर्मया 13:10

मी यहुदाच्या उद्दाम आणि पापी लोकांचा नाश करीन. ते लोक माझा संदेश ऐकण्याचे नाकारतात. ते दुराग्रही असून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी करतात. ते दुसऱ्या देवांना अनुसरतात व त्यांची पूजा करतात. यहूदाच्या अशा लोकांची गत ह्या तागाच्या घागऱ्याप्रमाणे होईल. त्यांचा नाश होऊन ते निरुपयोगी ठरतील.

यिर्मया 13:25

तुमच्याबाबत माझी योजना ही अशी आहे आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे.“हे असे का घडेल? कारण तुम्हाला माझा विसर पडला. तुम्ही खोट्या देवावर विश्वास ठेवला.

यिर्मया 18:15

पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात. ते जे काय करतात, त्यालाच अडखळतात त्यांच्या पूर्वजांच्या जुन्या रस्त्यांपाशी ते अडखळतात माझी माणसे, माझ्यामागून चांगल्या मार्गाने येण्याऐवजी, आडवळणाने व वाईट मार्गाने जाणे पसंत करतील.

यिर्मया 23:27

हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली,

यहेज्केल 16:10

मीतुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली.

यहेज्केल 22:12

“यरुशलेममध्ये, तुम्ही, लोकांना मारण्यासाठी पैसे घेता, उसने पैसे दिल्यास त्यावर व्याज आकारता, थोड्याशा पैशाकरीता शेजाऱ्यांना फसविता. तुम्ही लोक मला विसरले आहात. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

होशेय 8:14

इस्राएलने राजवाडे बांधले. पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे. पण मी यहूदातील गावाला आग लावीन आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”

1 पेत्र 3:3

तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.

प्रकटीकरण 21:2

पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर ʊयरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.

Interlinear

Choose Theme