परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल.
Cross references
तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.”त्या कुमारिकेकडे पाहाती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
तू विश्वासघातकी मुलगी होतीस. पण तू बदलशील. तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?” “परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे. स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.“
त्याचे नाव तू येशू4ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”
आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यंामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे.
परंतुजेव्हा काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला, जो स्त्रीपासून जन्मला, व नियम शास्त्राप्रमाणे वागला.
आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीति आहे, जी शुद्ध अंत:करणातून, चांगल्या सदसदविवेकबुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते.
परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभुच्या कृपेने ओसंडून वाहिली.
त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वत:ला साध्यासुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने, शोभित करावे. त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करु नयेत. तसेच सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे वापरु नयेत.
ती आम्हाला शिकविते की, आपण अभक्ति व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुज्ञपणाने व नीतीने वागावे, व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी.
सर्व गोष्टींचा शेवट होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून पूर्णपणे सावधानतेने वागा आणि प्रार्थना करण्यास सतत तयार राहा.