Home Bibles 1 थेस्सलनीकाकरांस 1:8 · मराठी बायबल
1 थेस्सलनीकाकरांस 1:8 · मराठी बायबल

कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही.

Cross references

निर्गम 18:9

परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसरच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.

यशया 2:3

पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.

यशया 52:7

“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.

यशया 66:19

काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.

रोमकरांस 1:8

सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे.

रोमकरांस 10:14

परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील?

रोमकरांस 16:19

त्यांच्यापासून दूर राहा कारण सर्व विश्वास णाऱ्यांना तुंम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे, म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते.

1 करिंथकरांस 14:36

तुमच्याकडूनच देवाचा संदेश बाहेर गेला होता काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे?

2 करिंथकरांस 3:4

देवासमोर ख्रिस्ताद्धारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे.

2 थेस्सलनीकाकरांस 1:4

म्हणून आम्हाला स्वत: देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात व तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.

2 थेस्सलनीकाकरांस 3:1

आम्हाला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेत: बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूच्या संदेशाचा प्रसार लवकर व्हावा आणि ते गौरविले जावे.

3 योहान 1:12

प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व सत्यदेखील तसेच सांगते. आणि आम्ही देखील त्याच्याविषयी तसेचम्हणतो, आणि तुम्हांला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.

प्रकटीकरण 14:6

मग मी आणखी एक देवदूत हवेत उंच उडताना पाहिला. पृथ्वीवरील लोकांना सांगण्यासाठी म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या,वंशाच्या, भाषेच्या आणि जमातीच्या लोकांना सांगण्यासाठी त्या देवदूताकडे अनंतकाळचे शुभवर्तमान होते.

प्रकटीकरण 22:17

आत्मा आणि नवरी असे म्हणतात की,“ये! आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तोफुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.

Interlinear

Choose Theme