Home Bibles 3 योहान 1:12 · मराठी बायबल
3 योहान 1:12 · मराठी बायबल

प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व सत्यदेखील तसेच सांगते. आणि आम्ही देखील त्याच्याविषयी तसेचम्हणतो, आणि तुम्हांला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.

Cross references

1 शमुवेल 12:4

यावर सर्व इस्राएलांनी उत्तर दिले, “नाही, तुमच्या हातून कोणतेही कुकर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”

योहान 19:35

ज्या मनुष्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की, तो खरे बोलतो व तो साक्ष देतो यासाठी की, तुम्ही विश्वास धरावा.

योहान 21:24

जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 10:22

ती माणसे म्हणाली, “एका पवित्र दूताने तुम्हांला आमंत्रित करण्याविषयी करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो चांगला धर्मशील मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हांला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 22:12

“नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता. तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याबद्दल चांगले बोलत.

1 थेस्सलनीकाकरांस 4:12

यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.

1 तीमथ्याला 3:7

आणखी म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये त्याचे चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये. व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये

Interlinear

Choose Theme