Home Bibles 1 शमुवेल 30:24 · मराठी बायबल
1 शमुवेल 30:24 · मराठी बायबल

तुम्ही म्हणता ते कोणी ऐकणार नाही. जे इथे सामानसुमानाजवळ थांबले ते आणि युध्दावर आले ते अशा सर्वांना सारखाच वाटा मिळेल. वाटण्या समान होतील.”

Cross references

गणना 31:27

नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलच्या इतर लोकांत त्यांची वाटणी करा.

यहोशवा 22:8

तो म्हणाला, “तुम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले आहे. भरपूर गुरेढोरे आहेत सोने, रुपे, मौल्यवान दागदागिने तुमच्याकडे आहेत. सुंदर, तलम वस्त्रे आहेत. शत्रूच्या लुटीतील अनेक वस्तू तुम्ही घेतल्या आहेत. त्यांची आपापसात वाटणी करुन आता आपापल्या ठिकाणी परत जा.”

1 शमुवेल 22:2

वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले. आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.

1 शमुवेल 25:13

तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.

स्तोत्रसंहिता 68:12

शक्तिमान राजांची सैन्ये पळून गेली. सैनिकांनी युध्दातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील. जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्तीत वाटा घेतील.

Interlinear

Choose Theme