दावीद त्यांना म्हणाला, “नाही, असे वागू नका. परमेश्वराने आपल्याला काय दिले त्याचा विचार करा. परमेश्वरामुळे शत्रूचा पारभव आपण करु शकलो.
Cross references
लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका.
त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.
तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
हे धन मी माझ्याट बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.’
तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे.
म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका.
परमेश्वरच काहीना दरिद्री तर काहींना श्रीमंत करतो. काही लोकांना लाचार करतो तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “आमच्या कुटुंबियांना धरुन नेणाऱ्या शत्रूंचा पाठलाग करु का? शत्रू आमच्या तावडीत सापडेल का?” यावर परमेश्वराने सांगितले, “अवश्य त्यांच्या पाठलागावर जाऊन त्यांना पकड. आपल्या घरच्यांची तू सोडवाणूक करशील.”
वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच. सर्वांवर तुझा अधिकार आहे. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
त्याचे जाळे त्याला, श्रीमंत म्हणून जगायला व उत्तम अन्नाच्या चवीचे सुख मिळवायला मदत करते. म्हणून शत्रू जाळ्यांची आराधना करतो. त्याच्या जाळ्याचा मान राखण्यासाठी तो यज्ञ अर्पण करतो आणि धूप जाळतो.
स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते.
“बंधूनो व वडीलजनांनो, “मी माझ्या बचावासाठी जे काही सांगतो ते ऐका.”