Home Bibles 1 शमुवेल 2:36 · मराठी बायबल
1 शमुवेल 2:36 · मराठी बायबल

मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”

Cross references

शास्ते 17:10

मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नावस्त्रही देईन.”त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले.

1 शमुवेल 2:29

तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वत:साठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’

1 राजे 2:27

परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.

यहेज्केल 44:10

भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल.

मलाखी 1:13

आणि त्या वेदीवरचे अन्न तुम्हाला आवडत नाही तुम्ही त्याचा वास घेता आणि खाण्यास नकार देता. तुमच्या मते ते वाईट आहे. पण हे खरे नाही. मग तुम्ही आजारी, लंगडी अथवा (जबरदस्तीने) चोरुन आणलेली जनावरे माझ्यासाठी आणता. रोगी जनावरांना मला यज्ञबली म्हणून अर्पण करण्याचा प्रयत्न करता. पण मी त्यांचा स्वीकार करणार नाही.

Interlinear

Choose Theme