भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल.
Cross references
मग काइन म्हणाला, “ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे.
कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीनेपाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”
लेवीचे जे वंशज दर्शन मंडपात काम करतात ते त्याच्याविरुद्ध केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. मी इस्राएल लोकांना जी जमीन देण्याचे वचन दिले आहे ती जमीन लेवीना मिळणार नाही.
याजक या काळात यरुशलेमला यज्ञबळी आणून मंदिरातील वेदीवर वाहात नव्हते. यहूदातील वेगवेगळ्या शहरामध्ये हे याजक राहात होते. त्या त्या ठिकाणच्या उंचस्थानावरील ठिकाणी ते धूप जाळत आणि यज्ञ करत. गेबापासून बैर-शेब्यापर्यंत अशी उंचस्थाने होती. आणि हे याजक आपली बेखमीर भाकर यरुशलेममधील मंदिरात विशिष्ट ठिकाणी न खाता त्या त्या गावांमध्ये सामान्य लोकांबरोबर बसून खात. पण राजाने ही उंचस्थाने मोडली आणि याजकांना यरुशलेमला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंचस्थानेही योशीयाने उद्ध्वस्त केली.
सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाणा असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात.
आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या खबरदारीच्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.
मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्याच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.
त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल. माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेईल.
“संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा पापी आहेत. माझ्या मंदिरात दुष्कृत्ये करताना मी त्यांना पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
“याजकांनी माझ्या शिकवणुकीचा नाश केला. माझ्या पवित्र वस्तू त्यांनी अपवित्र केल्या. त्यांना महत्व देत नाहीत. ते माझ्या पवित्र गोष्टी व इतर अपवित्र गोष्टी ह्यात फरक करीत नाहीत. शुद्ध व अशुद्ध गोष्टी सारख्याच मानतात. ते लोकांनाही ह्याबद्दल शिकवण देत नाहीत. माझ्या सुटृ्यांच्या खास दिवसांचा मान राखत नाहीत. त्यांनी माझे पावित्र नष्ट केले.
“सर्व याजक लेवी - वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
ही जमीन सादोकच्या वशांजासाठी असेल. माझे पवित्र याजक म्हणून ह्या लोकांची निवड केली गेली होती का? कारण इस्राएलच्या लोकांनी जेव्हा माझा त्याग केला, तेव्हा त्यांनी माझी सेवा केली. लेवीच्या इतर वंशांप्रमाणे सादोकच्या लोकांनी मला सोडून दिले नाही.
म्हणजेच याजक लोकांपेक्षा वेगळे नाहीत. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन. त्यांच्या चुकांची मी परतफेड करीन.
तिचे संदेष्टे अविचारी असून जास्तीच जास्त हडप करण्यासाठी नेहमीच कट करीत असतात तिचे याजक पवित्र गोष्टी अपवित्र गोष्टींप्राणेच हाताळतात. देवाच्या शिकवणुकीचा त्यांनी वाईट उपयोग केला आहे.
देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वत:ला शुद्ध राख.