Home Bibles 1 शमुवेल 14:50 · मराठी बायबल
1 शमुवेल 14:50 · मराठी बायबल

अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी.शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.

Cross references

1 शमुवेल 10:14

त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले.शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाहीत तेव्हा शमुवेलला भेटायला आम्ही गेलो.”

1 शमुवेल 17:55

शौलने दावीदला गल्याथशी लढायला जाताना पाहिले आणि आबनेर या आपल्या सेनापतीला विचारले, “हा तरुण कोणाचा मुलगा?”आबनेर म्हणाला, “मला काहीच कल्यना नाही, धनी.”

1 शमुवेल 26:5

तेव्हा शौलच्या तळावरच तो गेला. शौल आणि अबनेर त्याला झोपलेले आढळले. (नेरचा मुलगा अबनेर हा शौलच्या सैन्याचा प्रमुख होता.) शौल मध्यभागी झोपलेला असून बाकी सर्वजण त्याच्याभोवती झोपलेले होते.

2 शमुवेल 2:8

नेरचा मुला अबनेर हा शौलचा सेनापती होता. इकडे तो शौलचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.

2 शमुवेल 3:6

शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले.

2 शमुवेल 3:27

हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटात वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेरने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.

2 शमुवेल 3:38

दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज एक महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणताच.

1 इतिहास 27:21

पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.

Interlinear

Choose Theme