Home Bibles 1 शमुवेल 14:41 · मराठी बायबल
1 शमुवेल 14:41 · मराठी बायबल

मग शौलाने प्रार्थना केली, “इस्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक”शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुटले.

Cross references

यहोशवा 7:16

दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व इस्राएल लोकांना परमेश्वरासमोर आणले. सर्व वंशांचे लोक परमेश्वरापुढे उभे राहिले. परमेश्वराने यहूदाच्या वंशाची निवड केली.

1 शमुवेल 10:20

सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली.

नीतिसूत्रे 16:33

लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात.

नीतिसूत्रे 18:18

दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले.

योना 1:7

मग लोक एकमेकांना म्हणाले, “आपल्यावर हे संकट का आले हे आपण चिठ्या टाकून पाहावे.” म्हणून त्यांनी चिठ्या टाकल्या. त्यावरुन त्यांना कळले की योनामुळे हे संकट आले.

प्रेषितांचीं कृत्यें 1:24

प्रेषितांनी प्रार्थना केली, “प्रभु, तू सर्वांची मने जाणतोस. या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहेस हे आम्हांला सांग. यहूदाने या सेवेकडे पाठ फिरवली. आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला.’

Interlinear

Choose Theme