Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 1:24 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 1:24 · मराठी बायबल

प्रेषितांनी प्रार्थना केली, “प्रभु, तू सर्वांची मने जाणतोस. या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहेस हे आम्हांला सांग. यहूदाने या सेवेकडे पाठ फिरवली. आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला.’

Cross references

गणना 27:16

“लोक काय विचार करतात ते परमेश्वर देवाला कळते.

1 शमुवेल 16:7

तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”

1 राजे 8:39

तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.

1 इतिहास 28:9

“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो.

1 इतिहास 29:17

हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.

स्तोत्रसंहिता 7:9

वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस.

स्तोत्रसंहिता 44:21

देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात. त्याला आपल्या ह्दयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.

नीतिसूत्रे 3:5

परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.

नीतिसूत्रे 15:11

परमेश्वराला सर्व माहीत असते. मृत्युलोकांत काय घडते ते देखील त्याला माहीत असते. म्हणून लोकांच्या मनात आणि हृदयात काय चालले आहे ते परमेश्वराला नक्कीच ठाऊक असेल.

यिर्मया 11:20

पण परमेश्वरा तू खरा न्यायी आहेस. लोकांच्या ह्दयांची व मनांची कशी परीक्षा करावयाची हे तू जाणतोस. मी तुला माझे मुद्दे सांगेन आणि त्यांना योग्य शिक्षा देण्याचे तुझ्यावर सोपवीन.

यिर्मया 17:10

पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.

यिर्मया 20:12

सर्व शक्तिमान परमेश्वरा तू चांगल्या लोकांची परीक्षा घेतोस. तू माणसाच्या मनात खोलवर पाहतोस. मी त्या लोकांविरुद्धचे माझे मुद्दे तुला सांगितले. मग आता तू त्यांना योग्य शिक्षा करताना मला पाहायला मिळू देत.

लूक 6:12

त्या दिवसांत असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना काण्यात घालविली.

योहान 2:24

परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते.

योहान 21:17

तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, ‘तू माझ्यावर प्रीति करतोस का?’तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार.

प्रेषितांचीं कृत्यें 6:6

नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.

प्रेषितांचीं कृत्यें 13:2

ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले. आहे”

प्रेषितांचीं कृत्यें 14:23

पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभु येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभुच्या हाती सोपविले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:8

देव सर्वांचे विचार जाणतो, आणि त्याने या यहूदीतर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हांला पवित्र आत्मा दिला, तसाच त्यांनाही देऊन त्याने हे आम्हांस दाखवूत दिले.

रोमकरांस 8:27

परंतु जो देव आपली अंत:करणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो.

इब्री लोकांस 4:13

आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.

प्रकटीकरण 2:23

तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन.मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंत:करणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचामोबदला देईन.

Interlinear

Choose Theme