Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 13:11 · मराठी बायबल
1 शमुवेल 13:11 · मराठी बायबल

शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?” शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली.

Cross references

उत्पत्ति 3:13

मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”

उत्पत्ति 4:10

नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस?

यहोशवा 7:19

मग यहोशवा आखानला म्हणाला, “मुला, आता प्रार्थना कर. इस्राएलांच्या परमेश्वर देवाचा मान राखून आपली पापे त्याच्यापुढे कबूल कर. आता काहीही लपवून न ठेवता तू काय केलेस ते मला सांग.”

1 शमुवेल 13:2

त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.

1 शमुवेल 13:5

इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथआणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.

1 शमुवेल 13:16

आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ट्यांचा तळ होता.

1 शमुवेल 13:23

पलिष्टी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.

1 शमुवेल 14:5

एक सुळका उत्तरेला मिखमाशच्या दिशेने तर दुसरा दक्षिणेला गिबाकडे वळलेला होता.

2 शमुवेल 3:24

तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्याला तसेच जाऊ दिलेत! असे का?

2 राजे 5:25

गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कुठे गेला होतास?”गेहजी म्हणाला, “मी कुठेच गेलो नव्हतो.”

यशया 10:28

अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.

Interlinear

Choose Theme