तेव्हा एली म्हणाला, “शांती ने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”
Cross references
तो पुरोहित त्या पाच जणांना म्हणाला, “तुम्ही शांततेने जा. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल.”
योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”
दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”
तेव्हा तू शांतपणे माघारी फीर. पलिष्टी अधिकाऱ्यांना काहीही उपद्रव देऊ नको.”
तेव्हा राजा दावीदाने त्याला निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले. अबशालोम हेब्रोन येथे आला.
तेव्हा अलीशाने नामानला निर्धास्तपणे जायला सांगून निरोप दिला.”मग नामान तिथून निघाला आणि थोडा पुढे गेला असेल तेवढ्यात
याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.
तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.
पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”
तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.”