मग हिरामने दहा पितळी पालख्या केल्या. प्रत्येक पालखी सहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि साडे चार फूट उंच होती.
Cross references
हिरामने अशीच दहा गंगाळी केली. ती या दहा पालख्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळ सहाफुटी होते. त्यात दोनशेतीस गलन पाणी मावू शकत असे.
परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करुन ते पितळ त्यांनी बाबेलला नेले.
अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू:दोन पितळी स्तंभ (प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.)एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.
तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
यरुशलेम मध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींबद्दल सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की मंदिरात अजूनही स्तंभ, काशाचे गंगाळ, हलविता येणाऱ्या बैठकी आणि इतर गोष्टी आहेत.
बाबेलच्या सैन्याने मंदिरातील पितळी खांब, घंगाळ व बैठकीमोडल्या. त्यांनी ते सर्व पितळ बाबेलला नेले. त्याच्याबरोबर पात्रे, फावडी, वात सारखी करण्याच्या कात्र्या, वाडगे, तसराळी आणि मंदिरातील पूजेची उपकरणेही नेली.
दोन खांब, घंगाळ, त्याखालील बारा बैल व सरकत्या बैठकी अतिशप जड होत्या. शलमोन राजाने त्या परमेश्वराच्या मंदिरासाठी बनविल्या होत्या. ह्या वस्तूंसाठी वापरलेल्या पितळाचे वजन करणे अशक्य होते.