प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले त्या स्थितीत राहावे.
Cross references
घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी.
जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो.
तुला गुलाम म्हणून पाचारण झाले होते काय? त्यामुळे तुला त्रास होऊ नये, परंतु तुला स्वतंत्र होणे शक्य असेल तर पुढे हो व संधीचा उपयोग करुन घे.
तुम्ही पत्नीशी बांधलेले आहात काय? तर मोकळे होण्यास पाहू नका. स्त्रीपासून मोकळे आहात काय? लग्न करण्याचे पाहू नका.
आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वत:च्या हातांनी काम करण्याची इच्छा करा.
आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वत:ची भाकर स्वत:च मिळवून खावी.