Home Bibles ☰ Books लूक 3:10 · मराठी बायबल
लूक 3:10 · मराठी बायबल

जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”

Cross references

लूक 3:8

पश्चात्तापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे.

लूक 3:12

काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”

लूक 3:14

काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

प्रेषितांचीं कृत्यें 2:37

जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”

प्रेषितांचीं कृत्यें 9:6

आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 16:30

मग त्यांने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, “पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?”

Interlinear

Choose Theme