Home Bibles 1 करिंथकरांस 15:57 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 15:57 · मराठी बायबल

पण देवाला धन्यावाद असो, जो प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!

Cross references

2 राजे 5:1

नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.

1 इतिहास 22:11

दावीद म्हणाला, “मुला, तुला परमेश्वराची अखंड साथ लाभो. तुला यश मिळो. परमेश्वर देवाने भाकीत केल्याप्रमाणे तुझ्याहातून त्याचे मंदिर बांधून होवो.

स्तोत्रसंहिता 98:1

परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.

नीतिसूत्रे 21:31

लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द जिंकू शकत नाहीत.

योहान 16:33

‘मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:35

असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.

रोमकरांस 7:25

परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.

रोमकरांस 8:37

तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत.

1 करिंथकरांस 15:51

पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.

2 करिंथकरांस 1:11

तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हांला मदत करावी. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे.

2 करिंथकरांस 2:14

पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो.

2 करिंथकरांस 9:15

देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो.

इफिसकरांस 5:20

आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.

1 योहान 5:4

कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो,आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला: आमच्या विश्वासाने.

प्रकटीकरण 12:11

आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते, त्या सत्याने पराभव केला.त्यांनी त्यांच्या जिवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही,

प्रकटीकरण 15:2

मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्यानावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती.

Interlinear

Choose Theme