Home Bibles 1 इतिहास 22:11 · मराठी बायबल
1 इतिहास 22:11 · मराठी बायबल

दावीद म्हणाला, “मुला, तुला परमेश्वराची अखंड साथ लाभो. तुला यश मिळो. परमेश्वर देवाने भाकीत केल्याप्रमाणे तुझ्याहातून त्याचे मंदिर बांधून होवो.

Cross references

1 शमुवेल 20:13

त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो.

1 इतिहास 22:16

सोने, चांदी, पितळ, लोखंड यांच्या कारागिरीत ते निपुण आहेत. शिवाय हे कारागिर काही थोडे थोडके नाहीत. असंख्य आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. तुला परमेश्वराची साथ मिळो.”

1 इतिहास 28:20

दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील.

2 इतिहास 1:1

परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.

2 इतिहास 6:10

0आता परमेश्वराने कबूल केले तसे झाले आहे. माझे वडील दावीद यांच्या जागी मी नवीन राजा झालो आहे. मी इस्राएलचा राजा आहे. असे होईल हे वचन परमेश्वराने दिले होते. आणि मी इस्राएलचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे

यशया 26:12

परमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे.

मत्तय 1:23

“कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”

मत्तय 28:20

आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.ʈ

रोमकरांस 15:33

शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

2 तीमथ्थाला 4:22

प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.

Interlinear

Choose Theme