एहूदचे वंशज खालील प्रमाणे: नामान, अहीया आणि गेरा. हे गेबातील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांना आपापली गावे सोडायला लावून सक्तीने मानाहथ येथे नेण्यात आले. गेराने त्यांना कैद केले. गेराने उज्जा आणि अहीहूद यांना जन्म दिला.
Cross references
बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
बन्यामीनच्या प्रदेशातील नगरे अहरोनच्या वंशजांना मिळाली. ती म्हणजे, गिबोन, गेबा,
एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकटा होता.तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरुन उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता.
एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.
यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा.
किर्याथ-यारीमची मुहूर्त मेढ रोवणारा शोबाल याचे वंशज असे: हारोवे, मनुहोथमथील अर्धे लोक,
सल्माचे वंशज याप्रमाणे: बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक.
बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.कहथच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.