Home Bibles 1 इतिहास 5:10 · मराठी बायबल
1 इतिहास 5:10 · मराठी बायबल

शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला.

Cross references

उत्पत्ति 21:9

ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता.

उत्पत्ति 25:12

अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ;

1 इतिहास 5:18

मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून 44,760 शूर सैनिक युध्दाला सज्ज असे होते. लढाईमध्ये ते प्रवीण होते. ढाली, तलवारी ते बाळगून होते. एवढेच नव्हे तर धनुष्य-बाण चालवणेही त्यांना अवगत होते.

1 इतिहास 5:19

हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यानी लढाया केल्या.

1 इतिहास 27:31

याजीज हाग्री मेंढरांचा मुख्या होता.राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.

स्तोत्रसंहिता 83:6

ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले, अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल, अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक. ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.

Interlinear

Choose Theme