सोन्या चांदीचे दिवे आणि दिवठणी यांचे नमुने केलेले होते. त्यातील प्रत्येक दिवा आणि दिवठण यासाठी नेमके किती चांदीसोने वापरायचे याची दावीदाने शलमोनाला कल्पना दिली. वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे या दीपमाळा वापरायच्या होत्या.
Cross references
“मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर व ते ठोकून बैठक व दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या व पाकळ्या तयार कर. व हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
साडेसात फूट उंचीचे जे स्तंभ होते त्याच्या घुमट्या फुलाच्या आकाराच्या होत्या.
शलमोनाने सोन्याच्या दहा दीपवृक्षही केले. हे त्याने त्यांचे विधीनुसार बनविले, आणि मंदिरात ठेवले. डावीकडे पाच आणि उजवीकडे पाच असे ते ठेवले.
मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिवआहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”
माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सातदीपसमया पाहिल्या.
जेसात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सातदीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.