पूर्व दरवाजावर सहा लेवी, उत्तर दरवाजावर चार लेवी, दक्षिण दरवाजावर चार जण, भांडाराच्या रक्षणासाठी दोन लेवी दिवसभर सतत पहारा देत.
Cross references
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
आपल्या वडलांच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या. परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या. लेवीना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवींची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वराला मानणाऱ्या दावीदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वराला वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वराला आलेल्या पवित्र भेटवस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्यात्या वडलांचे नाव इम्नाना लेवी.
दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,