Home Bibles 1 इतिहास 26:16 · मराठी बायबल
1 इतिहास 26:16 · मराठी बायबल

शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली.पहारेकरी एकमेकांलगत उभे असत.

Cross references

1 राजे 10:5

त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांच्या पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्रृर्याने थक्क झाली.

1 इतिहास 25:8

प्रत्येकाने कोणते काम करायचे हे ठरवायला चिठ्ठया टाकल्या जात. त्यांना एकसारखीच वागणूक मिळे. लहान थोर, गुरु-शिष्य असा त्यांच्यात भेदभाव नव्हता.

1 इतिहास 26:10

मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता.

2 इतिहास 9:4

त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्यांची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे मद्यपरिचारक आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिले आणि या दर्शनाने ती थक्क झाली.

नहेम्या 12:24

लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा मुलगा येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी हे भाऊ त्यांच्या पलीकडे उभे राहात. एक समूह दुसऱ्या समूहाला प्रत्युत्तर करी. देवाचा माणूस दावीद याची तशीच आज्ञा होती.

Interlinear

Choose Theme