इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने एक फर्मान काढून बोलवून घेतले. पाथरवटांची निवड त्याने त्यांच्यातून केली. देवाच्या मंदिरासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांचे होते.
Cross references
सोरेचा राजा हीराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले. गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.
त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.
भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले होते. खाणीतूनच ते योग्य मापाने कातून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना होतोड्या, कुऱ्हाही किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवताल्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडणे आणि दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.
सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.
हिराम सोराचा राजा होता. त्याने दावीदाकडे दूत पाठवले. याखेरीज त्याने गंधसरुचे ओंडके, गवंडी, सुतार हे देखील पाठवून दिले. दावीदासाठी घर बांधायला म्हणून त्याने ही मदत केली.
राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “देवाने शलमोनाला निवडले आहे. शलमोन अजून कोवळा तरुण आहे. या कामासाठी काय करायला लागेल त्याची त्याला पूर्ण कल्पना नाही. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे घर काही सामान्य माणसाचे नव्हे; ते परमेश्वराचे देवाचे निवासस्थान आहे.
आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”
शलमोनाने यानंतर इस्राएलमधल्या सर्व उपऱ्या लोकांची गणना केली. दावीदाने गणती केली होती त्यानंतरची ही गणती. दावीद हा शलमोनाचा पिता. या गणनेत त्यांना 1,53,600 उपरे लोक मिळाले.
इस्राएल लोक राहात असलेल्या प्रदेशात अनेक परकी लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी. त्यांना शलमोनाने वेठबिगार केले. हे लोक मूळचे इस्राएल नव्हते. या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पाथरवटांना आणि सुतारांना द्रव्य पुरवले. अन्नधान्य, द्राक्षारस आणि तेलही दिले. सोरी आणि सीदोनच्या लोकांकडून लबानोनहून गंधसरुची लाकडे मागवण्याचा मोबदला म्हणून त्यांनी या वस्तू दिल्या. शलमोनाने पहिल्यांदा हे मंदिर बांधताना आणले तसे या लोकांना हे ओंडके जलमार्गाने योफा या समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरात आणवायचे होते. या वाहतुकीला पारसचा राजा कोरेश याने परवानगी दिली.
“नंतर तुमचे शत्रू तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मेंढ्यांची काळजी घेतील. तुमच्या शत्रूंची मुले तुमच्या शेतांतून आणि मळ्यांतून कामे करतील.
आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला.
यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात.