Home Bibles 1 इतिहास 19:14 · मराठी बायबल
1 इतिहास 19:14 · मराठी बायबल

यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला.

Cross references

2 शमुवेल 10:13

यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरुन पळ काढला.

1 राजे 20:13

त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पारभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”

1 राजे 20:19

राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.

1 राजे 20:28

एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.

2 इतिहास 13:5

दावीद आणि त्याची मुले यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या. देवाने दावीदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.

यिर्मया 46:15

“मिसर, तुझे बलवान सैनिक मारले जातील. ते उभेच राहू शकणार नाहीत कारण परमेश्वरच त्यांना खाली पाडेल.

Interlinear

Choose Theme