Home Bibles 1 इतिहास 16:29 · मराठी बायबल
1 इतिहास 16:29 · मराठी बायबल

त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.

Cross references

1 राजे 8:41

“तुझी थोरवी आणि सामर्थ्य इतर लोकांच्याही कानावर जाईल. मग ते दूरदूरच्या ठिकाणांहून या मंदिरात प्रार्थनेसाठी येतील.

2 इतिहास 20:21

यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या.परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यानी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराने स्तवन करा कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”

स्तोत्रसंहिता 29:2

परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.

स्तोत्रसंहिता 50:2

सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.

स्तोत्रसंहिता 68:30

त्या “प्राण्यानी” तुला हवे ते करावे म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना” आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.

स्तोत्रसंहिता 72:10

तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे. शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.

स्तोत्रसंहिता 72:15

राजा चिरायु होवो! आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे. राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा, त्याला रोज आशीर्वाद द्या.

स्तोत्रसंहिता 89:5

परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.

स्तोत्रसंहिता 95:2

परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.

स्तोत्रसंहिता 96:6

त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.

स्तोत्रसंहिता 96:9

परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा. पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो.

स्तोत्रसंहिता 100:4

त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा.

स्तोत्रसंहिता 108:3

परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.

स्तोत्रसंहिता 110:3

तू तुझ्या सैन्याची जमावाजमव करशील त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील. त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील. हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील.

स्तोत्रसंहिता 148:13

परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.

यशया 6:3

ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.

यशया 60:6

मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.

यहेज्केल 7:20

“त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन.

यहेज्केल 24:25

“मानवपुत्रा, ती सुरक्षित जागा (यरुशलेम) मी लोकांकडून काढून घेईन. ते सुंदर ठिकाण त्यांना आनंद देते. त्यांना ते ठिकाण पाहायला आवडते. त्यांना ते खरोखरच प्रिय आहे. पण त्या वेळी, मी लोकांकडून ती नगरी आणि त्यांची मुले काढून घेईन. वाचलेला एकजण यरुशलेमबद्दल वाईट बातमी घेऊन तुझ्याकडे येईल.

प्रकटीकरण 4:9

जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकारस्तुति करीत होते आणि व जो सिंहासनावरबसलेला होता तो अनंतकाळपर्यंत जगत राहणारा आहे,

प्रकटीकरण 5:12

देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,“जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ति, शहाणपण आणि शक्ति, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे!”

प्रकटीकरण 7:12

ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्यादेवाची आहेत. आमेन!”

Interlinear

Interlinear data is unavailable for this verse.

Choose Theme