Home Bibles 1 इतिहास 11:3 · मराठी बायबल
1 इतिहास 11:3 · मराठी बायबल

इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते.

Cross references

शास्ते 11:11

तेव्हा इफ्ताह त्यांच्या बरोबर गेला. त्यांचा तो नेता आणि सेनापती बनला. मिस्पा नगरात परमेश्वरासमोर इफ्ताहने आपल्या सर्व शब्दांची उजळणी केली.”

1 शमुवेल 11:15

त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासमोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासमोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इस्राएली यांनी उत्सव साजरा केला.

1 शमुवेल 15:28

शमुवेल म्हणाला, “तू हा अंगराखा फाडलास तसे इस्राएलचे राज्य तुझ्याकडून परमेश्वराने हिसकावून घेतले आहे. तुझ्याच एका मित्राकडे ते सोपवले आहे. तो तुझ्या पेक्षा भला आहे.

1 शमुवेल 16:1

परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”

1 शमुवेल 16:3

इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगिन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”

1 शमुवेल 16:12

इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”

1 शमुवेल 16:13

शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.

1 शमुवेल 23:18

मग त्या दोघांनी परमेश्वरासमोर करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला

1 शमुवेल 28:17

परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद.

2 शमुवेल 2:4

यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करुन यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. मग त्याला ते म्हणाले, “याबेश गिलादच्या लोकांनी शौलचा दफनविधी केला.”

2 शमुवेल 5:3

मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

2 राजे 11:17

यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.

2 राजे 23:30

योशीयाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमला आणला. त्याला त्याच्या कबरीत पुरले.मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्याला पुढचा राजा केले.

1 इतिहास 11:10

दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले.

2 इतिहास 23:3

तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला.यहोयादा या लोकांना म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्याला अनुसरुन राजाचा मुलगा गादीवर येईल.

Interlinear

Choose Theme