1 इतिहास 1:43 · मराठी बायबल
इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी: बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
Cross references
उत्पत्ति 36:31
इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.
उत्पत्ति 49:10
यहूदाचे कुटुंबीय राजे होतीलआणि योग्य राजा येईपर्यंत त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील.
गणना 24:17
“मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
गणना 33:31
त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानला तळ दिला.