Cross references
तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपला बाप उघडानागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले;
तेव्हा नोहा म्हणाला,“कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.”
कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे,
मग अब्राहाम आपल्या मृत बायको जवळून उठला व तो हेथी लोकांस भेटण्यास गेला. तो म्हणाला,
ते हेथी लोक अब्राहामाला म्हणाले,
अब्राहामाची मालमत्ता झाली आणि त्याने त्या जागेचा आपल्या मयतासाठी स्मशानभूमि म्हणून उपयोग केला.
मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”
ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले.
मी तुमच्या पुढे गांधील माशा पाठवीन; त्यामुळे त्या गांधील माशाहिव्वी, कनानी, व हित्ती लोकांना तुमच्या देशातून निघून जावयास भाग पाडतील.
यार्देन नदीच्या पश्चिमेकडील हित्ती, अमोरी, कनानी, हिव्वी तसेच यबूसी लोकांच्या राजांनी या आयवरील चढाई विषयी ऐकले. या लोकांची राज्ये डोंगराळ भागात तसेच मैदानी प्रदेशात थेट लबानोनपर्यंत भूमध्य समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने पसरली होती.
दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले.