Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel नहेम्या 11
Aa
Parallel नहेम्या
Chapter 11
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
आता इस्राएली लोकांचे नेते यरुशलेम नगरात राहायला आले. बाकीच्या इस्राएलीपैकी कोणी कोणी जायचे ते ठरवायचे होते. म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. दर दहाजणापैकी एकाने यरुशलेम या पवित्र नगरात राहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरले.
1
The princes of the people lived in Jerusalem: the rest of the people also cast lots, to bring one of ten to dwell in Jerusalem the holy city, and nine parts in the other cities.
2
काही लोक स्वखुषीने यरुशलेममध्ये राहायला तयार झाले. त्याबद्दल इतरांनी त्यांना धन्यवाद दिले व आशीर्वाद दिले.
2
The people blessed all the men who willingly offered themselves to dwell in Jerusalem.
3
जे प्रांताचे नेते यरुशलेममध्ये राहायला गेले ते असे. (काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज यहुदाच्या गावामध्ये राहात होते. वेगवेगव्व्या गावांमध्ये ते आपापल्या वतनात होते.
3
Now these are the chiefs of the province who lived in Jerusalem: but in the cities of Judah lived everyone in his possession in their cities, to wit, Israel, the priests, and the Levites, and the Nethinim, and the children of Solomon's servants.
4
यरुशलेममध्ये काही यहुदी आणि बन्यामिनी घराण्यातील व्यक्ती राहात होत्या.)यरुशलेममध्ये आलेले यहुदाचे वंशज पुढीलप्रमाणे: उज्जीयाचा मुलगा अथाया, (उज्जीया जखऱ्याचा मुलगा, जखऱ्या अमऱ्याचा मुलगा आणि अमऱ्या शफाठ्याचा. शफाठ्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज)
4
In Jerusalem lived certain of the children of Judah, and of the children of Benjamin. Of the children of Judah: Athaiah the son of Uzziah, the son of Zechariah, the son of Amariah, the son of Shephatiah, the son of Mahalalel, of the children of Perez;
5
बारूखचा मुलगा मासेया (बारुख हा कोल-होजचा मुलगा, कोलहोजे हजायाचा मुलगा, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शेलहचा मुलगा.)
5
and Maaseiah the son of Baruch, the son of Colhozeh, the son of Hazaiah, the son of Adaiah, the son of Joiarib, the son of Zechariah, the son of the Shilonite.
6
पेरेसच्या यरुशलेममध्ये राहणाऱ्या वंशजांची संख्या 468होती. हे सर्व शूर पुरुष होते.
6
All the sons of Perez who lived in Jerusalem were four hundred sixty-eight valiant men.
7
यरुशलेममध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असे: मशुल्लामचा मुलगा सल्लू (मशूल्लाम योएदचा मुलगा, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा मुलगा, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा)
7
These are the sons of Benjamin: Sallu the son of Meshullam, the son of Joed, the son of Pedaiah, the son of Kolaiah, the son of Maaseiah, the son of Ithiel, the son of Jeshaiah.
8
यशायाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई होते. ते एकंदर 928 जण होते.
8
After him Gabbai, Sallai, nine hundred twenty-eight.
9
जिखरीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता. हसनुवाचा पुत्र यहुदा हा यरुशलेम नगराच्या दुसऱ्या विभागाचा अधिकारी होता.
9
Joel the son of Zichri was their overseer; and Judah the son of Hassenuah was second over the city.
10
यरुशलेममध्ये राहायला आलेले याजक पुढीलप्रमाणे: योयारीबचा मुलगा यदया, याखीन,
10
Of the priests: Jedaiah the son of Joiarib, Jachin,
11
हिल्कीयाचा मुलगा सराया (हिल्कीया मशुल्लामचा मुलगा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोमचा, मरायोम अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता.)
11
Seraiah the son of Hilkiah, the son of Meshullam, the son of Zadok, the son of Meraioth, the son of Ahitub, the ruler of the house of God,
12
आणि त्यांचे 822भाऊंबंद मंदिराचे काम करत होते. आणि यरोहामचा मुलगा अदाया (यरोहाम पलल्याचा मुलगा. पलल्या अम्हीचा, अम्झी जखऱ्याचा मुलगा, जखऱ्या पश्हूरचा आणि पश्हूर मल्कीयाचा)
12
and their brothers who did the work of the house, eight hundred twenty-two; and Adaiah the son of Jeroham, the son of Pelaliah, the son of Amzi, the son of Zechariah, the son of Pashhur, the son of Malchijah,
13
मल्कीयाचे 242भाऊबंद (हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते) अजरेलचा मुलगा अमशसइ (अजरेल अहजईचा मुलगा, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा)
13
and his brothers, chiefs of fathers' houses, two hundred forty-two; and Amashsai the son of Azarel, the son of Ahzai, the son of Meshillemoth, the son of Immer,
14
आणि इम्मेरचे 128भाऊबंद (हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.)
14
and their brothers, mighty men of valor, one hundred twenty-eight; and their overseer was Zabdiel, the son of Haggedolim.
15
यरुशलेममध्ये राहायला गेलेले लेवी पुढीलप्रमाणे: हश्शूबचा मुलगा शमया, (हश्शूब अज्रीकामचा मुलगा, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा)
15
Of the Levites: Shemaiah the son of Hasshub, the son of Azrikam, the son of Hashabiah, the son of Bunni;
16
शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.)
16
and Shabbethai and Jozabad, of the chiefs of the Levites, who had the oversight of the outward business of the house of God;
17
मत्तन्या, (हा मीखाचा मुलगा मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत.) व बकबुक्या (भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता) आणि शम्मूवाचा मुलगा अब्दा, (शम्मूवा गालालाचा मुलगा, गालाल यदुथूनाचा)
17
and Mattaniah the son of Mica, the son of Zabdi, the son of Asaph, who was the chief to begin the thanksgiving in prayer, and Bakbukiah, the second among his brothers; and Abda the son of Shammua, the son of Galal, the son of Jeduthun.
18
अशाप्रकारे यरुशलेम या पवित्र नगरात 284लेवी राहायला गेले.
18
All the Levites in the holy city were two hundred eighty-four.
19
यरुशलेममध्ये गेलेले द्वारपाल असे: अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे 172भाऊबंद नगराच्या दरवाजांवर ते पहारा करत.
19
Moreover the porters, Akkub, Talmon, and their brothers, who kept watch at the gates, were one hundred seventy-two.
20
बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले.
20
The residue of Israel, of the priests, the Levites, were in all the cities of Judah, everyone in his inheritance.
21
मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहात. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते.
21
But the Nethinim lived in Ophel: and Ziha and Gishpa were over the Nethinim.
22
उज्जी हा यरुशलेममधील लेवींचा प्रमुख होता. उज्जी हा बानीचा मुलगा. (बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा मुलगा. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती.
22
The overseer also of the Levites at Jerusalem was Uzzi the son of Bani, the son of Hashabiah, the son of Mattaniah, the son of Mica, of the sons of Asaph, the singers, over the business of the house of God.
23
ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे.
23
For there was a commandment from the king concerning them, and a settled provision for the singers, as every day required.
24
राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांना सांगत असे. (पथह्या हा मशेजबेल याचा मुलगा. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.)
24
Pethahiah the son of Meshezabel, of the children of Zerah the son of Judah, was at the king's hand in all matters concerning the people.
25
यहुदाच्या वंशातील लोक ज्या गावागावांमध्ये राहात ती गावे अशी: किर्याथ आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकब्सेल आणि त्या भोवतालची खेडी,
25
As for the villages, with their fields, some of the children of Judah lived in Kiriath Arba and the towns of it, and in Dibon and the towns of it, and in Jekabzeel and the villages of it,
26
आणि येशूवा, मोलादा, बेथ-पलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे,
26
and in Jeshua, and in Moladah, and Beth Pelet,
27
हसर शूवाल, बैरशेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी,
27
and in Hazar Shual, and in Beersheba and the towns of it,
28
सिक्लाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे,
28
and in Ziklag, and in Meconah and in the towns of it,
29
एनरिम्मोन, सारया, यर्मूथ
29
and in En-rimmon, and in Zorah, and in Jarmuth,
30
जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहुदाचे लोक बैरशेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहात होते.
30
Zanoah, Adullam, and their villages, Lachish and the fields of it, Azekah and the towns of it. So they encamped from Beersheba to the valley of Hinnom.
31
गेबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी
31
The children of Benjamin also lived from Geba onward, at Michmash and Aija, and at Bethel and the towns of it,
32
अनाथोथ, नोब, अनन्या,
32
at Anathoth, Nob, Ananiah,
33
हासोर, रामा, गित्तइम,
33
Hazor, Ramah, Gittaim,
34
हादीद, सबोइम, नबल्लट,
34
Hadid, Zeboim, Neballat,
35
लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहात होते.
35
Lod, and Ono, the valley of craftsmen.
36
लेवींच्या कुळातील लोकांचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.
36
Of the Levites, certain divisions in Judah were joined to Benjamin.
Choose Theme