Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel शास्ते 12
Aa
Parallel शास्ते
Chapter 12
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
एफ्राइमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.”
1
The men of Ephraim were gathered together, and passed northward; and they said to Jephthah, Why did you pass over to fight against the children of Ammon, and didn't call us to go with you? we will burn your house on you with fire.
2
इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही.
2
Jephthah said to them, I and my people were at great strife with the children of Ammon; and when I called you, you didn't save me out of their hand.
3
तुमची मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उतरुन मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?”
3
When I saw that you didn't save me, I put my life in my hand, and passed over against the children of Ammon, and Yahweh delivered them into my hand: why then are you come up to me this day, to fight against me?
4
मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युध्द केले. ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वत:चा प्रदेश सुध्दा नाही. तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला.
4
Then Jephthah gathered together all the men of Gilead, and fought with Ephraim; and the men of Gilead struck Ephraim, because they said, You are fugitives of Ephraim, you Gileadites, in the midst of Ephraim, and in the midst of Manasseh.
5
एफ्राईम देशाकडे जाणारे यार्देन नदीचे उतार गिलादांनी ताब्यात घेतले. कोणीही जिवंत राहिलेला एफ्राईम माणूस आला आणि नदी ओलांडून जाऊ देण्याची विनंती करायला लागला की गिलाद विचारत, “तू एफ्राईमचा आहेस का?” तो म्हणे, “नाही”
5
The Gileadites took the fords of the Jordan against the Ephraimites. It was so, that when any of the fugitives of Ephraim said, Let me go over, the men of Gilead said to him, Are you an Ephraimite? If he said, No;
6
मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चारायला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीट म्हणता येत नसे. तो म्हणे, “सिब्बोलेथ” तेव्हा हा माणूस एफ्राईम असलेयाचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उतारापाशी त्याला मारून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली.
6
then said they to him, Say now Shibboleth; and he said Sibboleth; for he couldn't manage to pronounce it right: then they laid hold on him, and killed him at the fords of the Jordan. There fell at that time of Ephraim forty-two thousand.
7
इफ्ताह सहा वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले.
7
Jephthah judged Israel six years. Then died Jephthah the Gileadite, and was buried in one of the cities of Gilead.
8
मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले.
8
After him Ibzan of Bethlehem judged Israel.
9
त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलांसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता.
9
He had thirty sons; and thirty daughters he sent abroad, and thirty daughters he brought in from abroad for his sons. He judged Israel seven years.
10
त्याच्या निधनानंतर बेथलहेममध्थे त्याचे दफन करण्यात आले.
10
Ibzan died, and was buried at Bethlehem.
11
त्यानंतर जबुलून वंशातील एलोन इस्राएलांचा न्यायाधीश झाला. तो त्या जागी दहा वर्षे होता.
11
After him Elon the Zebulunite judged Israel; and he judged Israel ten years.
12
मग तो वारला तेव्हा जबुलूनमधील अयालोन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
12
Elon the Zebulunite died, and was buried in Aijalon in the land of Zebulun.
13
एलोन नंतर हिल्लेलचा मुलगा अब्दोन न्यायाधीश झाला तो पिराथोनचा होता.
13
After him Abdon the son of Hillel the Pirathonite judged Israel.
14
त्याला चाळीस मुलगे आणि तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. अब्दोन आठ वर्षे इस्राएलांचा न्यायाधीश होता.
14
He had forty sons and thirty sons' sons, who rode on seventy donkey colts: and he judged Israel eight years.
15
पुढे त्याच्या मृत्यूनंतर पिराथोन येथे त्याला पुरण्यात आले. एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन हे ठिकाण आहे.
15
Abdon the son of Hillel the Pirathonite died, and was buried in Pirathon in the land of Ephraim, in the hill-country of the Amalekites.
Choose Theme