Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel ईयोब 34
Aa
Parallel ईयोब
Chapter 34
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला:
1
Moreover Elihu answered,
2
शहाण्या माणसांनो मी काय सांगतो ते ऐका. हुशार माणसांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
2
"Hear my words, you wise men; Give ear to me, you who have knowledge.
3
तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.
3
For the ear tries words, As the palate tastes food.
4
तेव्हा आपण आता या मुद्यांची तपासणी करु या आणि काय योग्य आहे याचा निर्णय करु या. काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
4
Let us choose for us that which is right. Let us know among ourselves what is good.
5
ईयोब म्हणतो, ‘मी, ईयोब निष्पाप आहे, आणि देव माझ्या बाबतीत न्यायी नाही.
5
For Job has said, 'I am righteous, God has taken away my right:
6
मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो. मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले.’
6
Notwithstanding my right I am considered a liar; My wound is incurable, though I am without disobedience.'
7
“ईयोबसारखा आणखी कुणी आहे का? तुम्ही ईयोबची मानहानी केली तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो.
7
What man is like Job, Who drinks scorn like water,
8
ईयोब वाईटांशी मैत्री करतो त्याला दुष्टांबरोबर राहायला आवडते.
8
Who goes in company with the workers of iniquity, And walks with wicked men?
9
मी असे का म्हणतो? कारण ईयोब म्हणतो की, ‘माणूस जर देवाला खुश करायला लागला तर त्याला त्यापासून काहीही मिळणार नाही.’
9
For he has said, 'It profits a man nothing That he should delight himself with God.'
10
“तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही. तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.
10
"Therefore listen to me, you men of understanding: Far be it from God, that he should do wickedness, From the Almighty, that he should commit iniquity.
11
एखादा माणूस जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करील. देव लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
11
For the work of a man will he render to him, And cause every man to find according to his ways.
12
हे सत्य आहे देव कधीही चुकत नाही, सर्वशक्तिमान देव नेहमीच न्याची असतो.
12
Yes surely, God will not do wickedly, Neither will the Almighty pervert justice.
13
देवाला कुणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कुणी सोपवली नाही. सारे काही देवानेच निर्माण केले आहे आणि सारे त्याच्याच नियंत्रणाखाली आहे.
13
Who gave him a charge over the earth? Or who has appointed him over the whole world?
14
जर देवाने पृथ्वीवरील लोकांचा आत्मा आणि श्वास घेऊन
14
If he set his heart on himself, If he gathered to himself his spirit and his breath;
15
टाकायचे ठरवले तर पृथ्वीवरील सर्वजण मरतील. सगळ्याची परत माती होईल.
15
All flesh would perish together, And man would turn again to dust.
16
“जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल.
16
"If now you have understanding, hear this. Listen to the voice of my words.
17
जो माणूस न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे. तू त्याला अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
17
Shall even one who hates justice govern? Will you condemn him who is righteous and mighty?�
18
एक देवच असा आहे जो राजांना ‘तुम्ही कवडीमोलाचे आहात’ असे म्हणू शकतो. देव पुढाऱ्यांना, ‘तुम्ही वाईट आहात.’ असे सांगू शकतो.
18
Who says to a king, 'Vile!' Or to nobles, 'Wicked!'
19
देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
19
Who doesn't respect the persons of princes, Nor regards the rich more than the poor; For they all are the work of his hands.
20
माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. ते आजारी पडतात आणि मरतात. अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
20
In a moment they die, even at midnight; The people are shaken and pass away, The mighty are taken away without hand.
21
“लोक जे करतात ते देव बघतो. देव माणसाची प्रत्येक हालचाल बघत असतो.
21
"For his eyes are on the ways of a man, He sees all his goings.
22
जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.
22
There is no darkness, nor thick gloom, Where the workers of iniquity may hide themselves.
23
देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते. लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही.
23
For he doesn't need to consider a man further, That he should go before God in judgment.
24
“शक्तिशाली लोकांनी वाईट कुत्ये केल्यावर देवाला त्यांना प्रश्र्न विचारण्याची गरज वाटत नाही. तो सहजपणे त्यांचा नाश करु शकतो आणि त्यांच्या जागी इतरांना पुढारी बनवू शकतो.
24
He breaks in pieces mighty men in ways past finding out, And sets others in their place.
25
तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
25
Therefore he takes knowledge of their works. He overturns them in the night, so that they are destroyed.
26
वाईट माणसांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल देव त्यांना शिक्षा करतो. आणि जिथे इतर लोक त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
26
He strikes them as wicked men In the open sight of others;
27
का? कारण वाईट माणसांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
27
Because they turned aside from following him, And wouldn't have regard in any of his ways:
28
हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
28
So that they caused the cry of the poor to come to him, He heard the cry of the afflicted.
29
देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कुणी अपराधी ठरवू शकणार नाही. देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही. तो लोकांवर आणि राज्यांवर राज्य करणारा राज्यकर्ता आहे.
29
When he gives quietness, who then can condemn? When he hides his face, who then can see him? Alike whether to a nation, or to a man:
30
परंतु जर एखादा माणूस वाईट असेल आणि इतरांना पाप करायला भाग पाडत असेल तर देव त्या माणसाला कधीही राज्यकर्ता होऊ देणार नाही.
30
That the godless man may not reign, That there be no one to ensnare the people.
31
जर तो माणूस देवाला म्हणेल की, “मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.
31
"For has any said to God, 'I am guilty, but I will not offend any more.
32
देवा, मी जरी तुला बघू शकत नसलो, तरी तू मला जगण्याचा योग्य मार्ग दाखव. मी जरी चुका केल्या असल्या तरी मी त्या पुन्हा करणार नाही.’ तरच असे घडेल.
32
Teach me that which I don't see. If I have done iniquity, I will do it no more'?
33
“ईयोब, तुला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते. परंतु तू मात्र बदलायला तयार नाहीस. ईयोब, हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. तुला काय वाटते ते मला सांग.
33
Shall his recompense be as you desire, that you refuse it? For you must choose, and not I. Therefore speak what you know.
34
शहाणा माणूस माझे ऐकेल. शहाणा माणूस म्हणेल.
34
Men of understanding will tell me, Yes, every wise man who hears me:
35
‘ईयोब एखाद्या अज्ञानी माणसासारखे बोलत आहे. तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
35
'Job speaks without knowledge, His words are without wisdom.'
36
‘ईयोबला अजून शिक्षा करायला हवी असे मला वाटते. का? कारण ईयोब एखाद्या वाईट माणसासारखे आपल्याला उत्तर देत आहे.
36
I wish that Job were tried to the end, Because of his answering like wicked men.
37
ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे. ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”
37
For he adds rebellion to his sin. He claps his hands among us, And multiplies his words against God."
Choose Theme