Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel ईयोब 22
Aa
Parallel ईयोब
Chapter 22
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
मग तेमानीच्या अलीफजने उत्तर दिले:
1
Then Eliphaz the Temanite answered,
2
“देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.
2
"Can a man be profitable to God? Surely he who is wise is profitable to himself.
3
तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही. तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही.
3
Is it any pleasure to the Almighty, that you are righteous? Or does it benefit him, that you make your ways perfect?
4
“ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
4
Is it for your piety that he reproves you, That he enters with you into judgment?
5
“नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस. ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस.
5
Isn't your wickedness great? Neither is there any end to your iniquities.
6
कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील. कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील. तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल.
6
For you have taken pledges from your brother for nothing, And stripped the naked of their clothing.
7
तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील.
7
You haven't given water to the weary to drink, And you have withheld bread from the hungry.
8
ईयोब, तुझ्याकडे पुष्कळ शेतजमीत आहे आणि लोक तुला मान देतात.
8
But as for the mighty man, he had the earth. The honorable man, he lived in it.
9
पण कदाचित् तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, ईयोब, तू कदाचित पोरक्या मुलांची फसवणूक केली असशील.
9
You have sent widows away empty, And the arms of the fatherless have been broken.
10
म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस.
10
Therefore snares are round about you. Sudden fear troubles you,
11
म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस.
11
Or darkness, so that you can not see, And floods of waters cover you.
12
“देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. तारे किती उंचावर आहेत ते बघ. देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो,
12
"Isn't God in the heights of heaven? See the height of the stars, how high they are!
13
पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?
13
You say, 'What does God know? Can he judge through the thick darkness?
14
आकाशाच्या किनाऱ्यावरुन चालताना त्याने आपल्याला बघू नये म्हणून दाट ढग त्याला आपल्यापासून लपवतात.
14
Thick clouds are a covering to him, so that he doesn't see. He walks on the vault of the sky.'
15
“ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.
15
Will you keep the old way Which wicked men have trodden,
16
त्या दुष्टांना मरणघाटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला. ते पुरात वाहून गेले.
16
Who were snatched away before their time, Whose foundation was poured out as a stream,
17
त्या लोकांनी देवाला सांगितले, ‘आम्हाला एकटे सोड तो सर्वशक्तिमान देव आम्हाला काहीही करु शकत नाही.’
17
Who said to God, 'Depart from us;' And, 'What can the Almighty do for us?'
18
आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.
18
Yet he filled their houses with good things, But the counsel of the wicked is far from me.
19
चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील. भोळे लोक वाईट लोकांना हसतात.
19
The righteous see it, and are glad; The innocent ridicule them,
20
“खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’
20
Saying, 'Surely those who rose up against us are cut off, The fire has consumed the remnant of them.'
21
“ईयोब, तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
21
"Acquaint yourself with him, now, and be at peace. Thereby good shall come to you.
22
त्यांच्या वचनांचा स्विकार कर. तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे.
22
Please receive instruction from his mouth, And lay up his words in your heart.
23
ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाकडे परत ये म्हणजे तुझी स्थिती पूर्ववत् होईल. परंतु तू तुझ्या घरातून वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजेस.
23
If you return to the Almighty, you shall be built up, If you put away unrighteousness far from your tents.
24
तू तुझ्या जवळ असलेल्या सोन्याला मातीमोल मानले पाहिजेस. तू तुझ्या सर्वात चांगल्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत दिली पाहिजेस.
24
Lay your treasure in the dust, The gold of Ophir among the stones of the brooks.
25
सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
25
The Almighty will be your treasure, Precious silver to you.
26
नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील.
26
For then shall you delight yourself in the Almighty, And shall lift up your face to God.
27
तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.
27
You shall make your prayer to him, and he will hear you. You shall pay your vows.
28
तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील. आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल.
28
You shall also decree a thing, and it shall be established to you. Light shall shine on your ways.
29
देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो. परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो.
29
When they cast down, you shall say, 'be lifted up.' He will save the humble person.
30
नंतर तू चुका करणाऱ्या लोकांना मदत करु शकशील. तू देवाजवळ प्रार्थना केलीस तर तो त्या लोकांना क्षमा करेल. का? कारण तू अतिशय पवित्र असशील.”
30
He will even deliver him who is not innocent; Yes, he shall be delivered through the cleanness of your hands."
Choose Theme